इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. 

उत्तर : 

इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन व पूर्ण आंतरिक परावर्तन या तीन नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे, ते खालील घटना क्रमावरून लक्षात येते. 

i) प्रथम प्रकाश किरण हवेत तरंगणाऱ्या पाण्याच्या थेंबात प्रवेश करतात म्हणजेच घन माध्यमात प्रवेश करतात. येथे अपवर्तन होऊन प्रकाश किरणे स्वत:चा मार्ग किंचित बदलवितात.

ii) पाण्याच्या थेंबात शिरलेले प्रकाश किरण पुढे मार्ग क्रमित होऊन पाण्याच्या थेंबाच्या पृष्ठभागावर पडतो. यावेळी त्याचा पुढील मार्ग विरळ माध्यमातून जाणारा असतो. पण यावेळी आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा मोठा असल्यामुळे ते विरळ माध्यमात प्रवेश न करता त्याचे पूर्ण आंतरिक परावर्तन होते. 

iii) ही पूर्ण आंतरिक परावर्तीत किरण पाण्याच्या थेंबातून बाहेर पडताना पुन्हा अपवर्तीत होते व वेगवेगळ्या रंगाची किरणे वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात म्हणजेच अपस्करण होते व सप्तरंग दिसू लागतात. 

iv) हा घटनाक्रम प्रत्येक पाण्याच्या थेंबात घडतो व त्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम होऊन इंद्रधनुष्य दिसू लागते. 

Previous Post Next Post