शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा

उत्तर :

ठरावीक तापमानास हवेच्या ठरावीक आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प (पाण्याची वाफ) सामावले जाऊ शकते. तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते.

शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिचे तापमान कक्ष तापमानापेक्षा (Room temperature) बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान कमी होते. परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात.

Previous Post Next Post