नालकुंतल म्हणजे काय ? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या

नालकुंतल म्हणजे काय ? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या

नालकुंतल म्हणजे काय ? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. 

उत्तर :

विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल असे म्हणतात. 


चुंबकीय क्षेत्र - नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीत दाखविली आहे. 

i) चुंबकपट्टीमुळे निर्माण होणाऱ्या बलरेषा व नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या रेषा यात सारखेपणा असतो. 

ii) दोन्ही प्रकारे निर्माण होणाऱ्या बलरेषांचे गुणधर्म समान असतात. 

iii) नालकुंतलाची उघडी टोके उत्तर व दक्षिण ध्रुव बनतात. 

iv) नालकुंतातील चुंबकीय बलरेषा समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. 

v) चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखी असते.   

Previous Post Next Post