दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

उत्तर : 

दहशतवादामुळे झालेले परिणाम - 

i) दहशतवादामुळे समाजात अशांतता पसरते आणि विकासकार्यांना खीळ बसते. 

ii) दहशतवादामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी व वित्तहानी होते. 

iii) दहशतवादामुळे अनेक सामाजिक व नैतिक समस्या निर्माण होतात. 

iv) दहशतवादामुळे जातिवाद, प्रदेशवाद भाषावाद, जमातवाद यांसारख्या समस्या बळावतात. 

v) दहशतवादामुळे सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होते. प्रामुख्याने लहान मुले व तरुण पिढीचे योग्य सामाजिकरण न झाल्यामुळे ते असामाजिक कृत्यांकडे आकृष्ट होतात. 

vi) देशाची जास्तीत जास्त शक्ती दहशतवादी कारवायांत खर्च होत असल्यामुळे नवीन उद्योग, नवीन विकास योजना व आर्थिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या मार्गांत अडथळे निर्माण होतात. 

vii) दहशतवादामुळे महागाई वाढते. तसेच चोऱ्या, दरोडे, लुटमार, भ्रष्टाचार इत्यादी अनेक असामाजिक प्रकारांना प्रोत्साहन मिळते. 

viii) दहशतवादामुळे समाजाचे व राष्ट्राचे ऐक्य धोक्यात येते. 

ix) दहशतवादामुळे लोकशाही प्रणालीवर आघात होतो. 

x) दहशतवादामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो.


दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय - 

i) सामाजिक व आर्थिक विषमतेला आळा घालण्यासाठी ठोस उपाय अमलात आणले पाहिजे. त्यासाठी घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे झाली पाहिजे. 

ii) दहशतवादाची कारणे शोधून ती समुळ नष्ट करण्यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर आंदोलने केली पाहिजे. 

iii) दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळेल अशी कायदेशीर व न्यायीक प्रक्रिया केली जावी. 

iv) प्रत्येक देशाच्या सीमेबाहरचा दहशवाद रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व कार्यक्षम केली जावी. 

v) विविध प्रसार माध्यमांच्या साहाय्याने दहशतवाद विरोधी प्रचार अभियान राबविले पाहिजे. 

vi) दहशतवादविरोधी मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणावेत. 

vii) भाषिक व प्रादेशिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय केले पाहिजे. 

viii) देशाची एकता व अखंडता यांना बाधा येईल अशा कृत्यांना खंबीरपणे आळा घातला जावा. 

ix) गरिबी व बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले जावेत. तसेच रोजगार निर्माण केला जावा. 

x) प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करून भ्रष्टाचारमुक्त अशी नि:पक्षपाती प्रशासन यंत्रणा निर्माण करावी. 

Previous Post Next Post