कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग

कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग

 

 स्पष्ट करा

प्रश्न

 

कार्बनच्या विविध अपरूपांचे उपयोग

उत्तर

 

कार्बनची अपरूपे व त्यांचे उपयोग पुढील प्रमाणे आहेत. 

1) स्फटिक रूप - उदा., हिरा, ग्रॅफाइट, फुलरिन

उपयोग - i) हिऱ्याचा उपयोग काच कापण्यासाठी व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांत वापरतात. अलंकार तयार करण्यासाठी, दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी, शस्त्रक्रियेच्या उपकरणांमध्ये करतात. 

ii) ग्रॅफाइटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी, पेन्सिलमध्ये, आर्क लॅम्पमध्ये, रंग, पॉलिश तयार करण्यासाठी कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी वापरतात. 

iii) फूलरिनचा उपयोग विसंवाहक म्हणून, जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून करतात.

2) अस्फटिकी अपरूपे - उदा. दगडी कोळसा, चारकोल, 'कोक उपयोग 

उपयोग - i) कारखान्यात व घरात कोळसा इंधन म्हणून वापरतात. 

ii) विद्युत निर्मितीसाठी, औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा वापरतात. 

iii) कोक, कोल गॅस व कोल टार मिळवण्यासाठी कोळशाचा उपयोग होतो. 

iv) कोक घरगुती इंधन म्हणून वापरतात. 

v) वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस निर्मितीत कोकचा उपयोग होतो.



Previous Post Next Post