घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो ? ते वातावरण कसे चांगले ठेवाल ?
उत्तर :
घरातील वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्याने घरातील वातावरण रोगजन्य बनते. त्यांच्या आजारांची कारणे असणारे विषाणू घरातील परिसरात कायम प्रस्थान ठेवून असतात. अशावेळी घरातले वातावरण स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. वृद्ध व्यक्तीची राहण्याची जागा स्वच्छ ठेवणे, त्यांच्या सेवा सूश्रुषेची योग्य सोय करणे व ते स्वच्छ ठेवणे, त्यांचे कपडे चादरी डेटॉल तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या निर्जतूकांचा वापर करून धुवावेत. तसेच आजारी व्यक्तीच्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची नखे, केस स्वच्छ करणे तसेच त्यांची आंघोळ घालणे गरजेचे आहे. अशाप्रकारे घरातील वातावरण आजारी व्यक्ती असूनही आरोग्यजन्य व प्रसन्न असेल.