भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला
उत्तर :
कारण i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ में १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली.
ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.