एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे पुढील प्रकारे आहे.
i) द्विविभाजन : द्विविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहेत.
बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकीपेशीतील काही पेशी यामध्ये या प्रकारचे प्रजनन घडते. या विभाजनात, जनक पेशीचे दोन समान भागांत विभाजन होते आणि प्रत्येक भागाचे नवजात पेशीत रूपांतर होते. अमिबामध्ये पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून म्हणजेच साधे विभाजन होते. काही सजीवांमध्ये द्विविभाजन हे आडव्या किंवा उभ्या अक्षातून होते. उदा. पॅरामेशियमचे आडवे द्विविभाजन तर युग्लीनाचे उभे द्विविभाजन.
ii) बहुविभाजन : बहुविभाजन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. या प्रकारचे विभाजन अमिबामध्ये घडते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपाद आत ओढून घेतो, गोलाकार बनतो व पेशीपटलाभोवती कडक संरक्षक कवच तयार करतो, त्यास पुटी म्हणतात. पुटीमध्ये केंद्रकाचे विभाजन होते. केंद्रक विभाजनांच्या पाठोपाठ पेशीद्रव्यांचेही विभाजन होते व अनेक नवजात पेशींची निर्मिती होते. अनुकूल परिस्थितीमध्ये पुटी फुटून अनेक अमिबा पेशी बाहेर पडतात.
| बहुविभाजन प्रक्रिया |
iii) कलिकायन : जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, त्यास कलिका म्हणतात. जनक पेशीच्या केंद्रकाचे विभाजन होते व दोन नवजात केंद्रक तयार होतात. एक नवजात केंद्रक कलिकेत प्रवेश करते. कलिकेचा आकार वाढतो. तो जनक पेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र वाढते. उदा. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते.
| कलिकायन |