जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे
उत्तर :
कारण - i) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे.
ii) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.
iii) सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.