कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे
उत्तर :
कंपोस्ट खत तयार करतांना जनावरांच्या गोठ्यातील टाकाऊ पदार्थ, कुक्कुटपालन केंद्रातील टाकाऊ पदार्थ, भाजीपाल्याचा कचरा तसेच भुईमुगाची टरफले हे सर्व मिश्रण एका तयार खड्ड्यात टाकले जाते. कचरा व माती यातील सूक्ष्मजीव या कचऱ्याचे विघटन करून कंपोस्ट खत तयार करतात. अशा सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीव नैसर्गिकरीत्या विघटन घडवून आणतात. त्यामुळे कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची महत्त्वाची भूमिका आहे.