उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत
उत्तर :
कारण - नायक्रोम या मिश्रधातूमध्ये खालील गुणधर्म आहेत की, जे उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणासाठी आवश्यक आहेत. ही सर्व गुणधर्म एकत्रपणे एकाच धातूमध्ये मिळत नाहीत. म्हणून शुद्ध धातू ऐवजी नायक्रोम मिश्रधातू वापरतात.
नायक्रोमचे गुणधर्म - i) उच्च वितळण बिंदू, ii) उच्च विद्युत रोध, iii) रासायनिकदृष्ट्या उदासिन, iv) अचुंबकीय, v) उत्तम विद्युत गुणधर्म.
उदाहरणार्थ - तन्यता, वर्धनियता, कठीणपणा, लवचिकता इत्यादी.
या सर्व गुणधर्मामुळे नायक्रोमची तार उच्च तापमान निर्माण करू शकते व त्यावर हवेचा परिणाम होत नाही त्यामुळे त्यापासून बनविलेले तारेची कुंडल अधिक टिकावू बनते. म्हणून उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणामध्ये नायक्रोमसारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात.