संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत
उत्तर :
कारण - i) एखाद्या समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्यांक म्हणतात.
ii) आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत.
iii) या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा. म्हणून संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.