इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात
उत्तर :
i) इंधने मिळवण्यासाठी (जळण्याचे लाकूड) सुबाभूळ, आजण, पळस, निलगिरी, कडूलिंब, चिंच इत्यादी वनस्पतींची लागवड करतात.
ii) ऊसाची मळी, गहू, मका या पिकांपासून इथॅनॉल इंधन मिळवले जाते.
iii) तसेच सोयाबीन, सूर्यफूल, पाम या वनस्पतींपासून बायोडिझेल मिळवले जाते. त्यासाठी या पिकांची लागवड केली जाते.