अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.

उत्तर :

अर्धगुणसूत्री विभाजन


• व्याख्या - अर्धगुणसूत्री विभाजन हा पेशी विभाजनाचा प्रकार होय. ज्यामध्ये गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते.

• याप्रकारचे विभाजन पुंयुग्मक व स्त्रीयुग्मक तयार होण्यासाठी आवश्यक असते.

• अर्धगुणसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.


अ) अर्धसूत्री विभाजन भाग I

ब) अर्धसूत्री विभाजन भाग II

अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या भागातील पूर्वावस्थेत पाच अवस्थांचा समावेश होतो.


i) लिप्टोटीन / लेप्टोटीन

• या अवस्थेत केंद्रक लांब व पातळ गुणसूत्रांनी भरलेले आढळते.

• या गुणसूत्रांवर कणिका आढळून येतात ज्याला गुणसूत्रकणिका म्हणतात.


ii) जाइगोटीन

• या अवस्थेत गुणसूत्रांचे युग्मन होते.

• ही क्रिया सारख्या गुणसूत्रांमध्ये होते.

• या प्रक्रियेत समजातीय गुणसूत्रांमध्ये (सिनॅप्ससिस) जोडी होते. याला 'जाइगोनेमा' सुद्धा म्हणतात.

• या जोडींना बाइवेलेंट वा चतुष्क सधा म्हणतात 

• हे समजातीय गुणसूत्र अर्धगुणसूत्री नसतात. 

• प्रत्येक चतुष्कात चार क्रोमेटिड्स असतात.


iii) पैकिटिन

• या अवस्थेत गुणसूत्रांची युग्मन प्रक्रिया पूर्ण होते. गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. समजात

• जनुकीय गुणसूत्रांमध्ये विचरण झाल्यामुळे समजातीय गुणसूत्रांमध्ये आनुवंशिक सामग्रीचे वहन होते.


iv) डिप्लोटिन

• या अवस्थेत समजातीय गुणसूत्रे वेगवेगळे होऊन x आकार घेताना दिसतात. ज्यांना काइज्मेटा म्हणतात.

• या प्रक्रियेला सीमान्तीकरण किंवा उपान्तीभवन सुद्धा म्हणतात.


v) डायकिनिसिस

• या अवस्थेमध्ये केंद्रके व केंद्रकावरील आवरण अदृश्य होते. या स्पींडल तंतू तयार होतात.

•या अवस्थेत पश्चावस्थेसाठी गुणसूत्रांची संख्या कमी होते.




Previous Post Next Post