कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा
उत्तर :
i) कंटकचर्मी प्राणीसंघातील प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात.
ii) हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. यांचे शरीर त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून प्रोेेढावस्थेत पंच - अरिय सममिती आढळते; परंतु त्यांच्या अळीअवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते.
iii) या प्राण्यांमध्ये पुनरुद्भवन/पुननिर्मिती ही क्षमता खूप चांगली असते.
iv) हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात.
उदा. तारामासा, सी-अर्चिन, ब्रिटलस्टार इत्यादी.