प्रतिध्वनी म्हणजे काय ? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?

प्रतिध्वनी म्हणजे काय ? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?

प्रश्न 

प्रतिध्वनी म्हणजे काय ? प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?

 उत्तर 

मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामूळे झालेली पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय. प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी खालील बाबी आवश्यक असतात. 

i) 22 °C तापमानाला हवेतील वेग 344 मीटर/सेकंद असतो. 

ii) आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहचल्यास तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येतो. 

iii) ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर काढण्याचे सूत्र

अंतर = वेग x काळ

= 344 मीटर / सेकंद x 0.1 सेकंद

= 34.4 मीटर.

iv) ध्वनी व प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी 22 °C तामपानाला ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागाचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजेच 17.2 मीटर असावे लागते.

Previous Post Next Post