जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा
उत्तर :
जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नसले तरी वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होते. सजीव सृष्टी हा परिसंस्थेचाच एक भाग आहे. पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरित परिणाम झाल्यास अन्नसाखळी ढासळते. याचाच परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतो. त्याचबरोबर धरणांमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात विस्थापन होते. मोठी जमीन तसेच जंगले व सुपीक जमीन पाण्याखाली येते. त्यामुळे गैरसोय निर्माण होऊन पर्यावरणावरही त्याचा विपरित परिणाम दिसून येतो. त्यामुळे जलविद्युत निर्मिती केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत असे म्हणता येणार नाही.