प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा राखीव जागांविषयक धोरण |
उत्तर | i) भारतीय समाजातील काही लोकसमूह हे वर्षानुवर्षे सामाजिक न्यायापासून दूरच राहिले. शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून ते दीर्घकाळ वंचित राहिले आहेत. ii) अशा लोकसमूहांना स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक होते. म्हणून संविधानकारांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात राखीव जागा ठेवण्याचे धोरण स्वीकारले. iii) त्यानंतर संसदेने इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली. iv) राखीव जागांविषयक धोरणामुळे वंचित समाजघटकांना न्याय मिळून आपला विकास करण्याची संधी मिळाली आहे. |