टिपा लिहा भूमिभरण स्थळे

टिपा लिहा भूमिभरण स्थळे

 

प्रश्न 

टिपा लिहा भूमिभरण स्थळे

 उत्तर 

 

i) भूमिभरण स्थळे या जागेमध्ये शहरांत जमा होणारा विघटनशील कचरा टाकला जातो.

ii) अशा जागा नागरी वस्तीपासून दूर आणि मोकळ्या ठिकाणी असतात.

iii) कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून होणारे मातीचे प्रदूषण टाळण्याकरिता या ठिकाणी प्लास्टिकचे अस्तर घातलेले खड्डे तयार केले जातात.   

iv) या खड्ड्यांत दाबून गोळा केलेला कचरा टाकला जातो व त्यावर माती लाकडाचा भुसा, पालापाचोळा असा हिरवा कचरा आणि विशिष्ट जैवरसायने यांचा थर पसरतात. 

v) काही ठिकाणी त्यात बायोरिअँक्टर्स (जीवाणूंचे समूह) मिसळले जातात.

vi) जैवरसायनातील सूक्ष्मजीव खड्ड्यातील कचऱ्याचे विघटन करतात.

vii) पूर्ण भरलेला खड्डा माती लिंपून बंद केला जातो. या कचऱ्यापासून जैवविघटन होऊन काही आठवड्यांनी उत्कृष्ट खत मिळते. 

viii) खत काढल्यानंतर रिकामे झालेले भूमिभरण स्थळ पुन्हा वापरता येते.



Previous Post Next Post