जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा
उत्तर :
i) जलविद्युत केंद्रातून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. अशा केंद्रातून कोणत्याही इंधनाचे ज्वलन होत नाही. त्यामुळे जलविद्युत ऊर्जा प्रदूषणकारी नसते.
ii) धरणात योग्य इतका पाणीसाठा असल्यास हवे तेव्हा विद्युतनिर्मिती करता येते.
iii) धरणात पाणी तुटवडा झाला, तरी पावसाने पुन्हा धरण भरू शकते आणि पुन्हा ऊर्जानिर्मिती शक्य होते.