थोडक्यात टिपा लिहा गॅल्व्हनायझिंग

थोडक्यात टिपा लिहा गॅल्व्हनायझिंग

 

प्रश्न 

थोडक्यात टिपा लिहा गॅल्व्हनायझिंग (Galvanizing) 


 उत्तर 

 

लोखंडाचे किंवा स्टीलचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो. या प्रक्रियेला गॅल्व्हनायझिंग म्हणतात. या पद्धतीत जस्त लोखंडापेक्षा विद्युतधन असल्याने त्याचे क्षरण आधी होते व काही वर्षांच्या कालावधीनंतर जस्ताचा थर निघून जातो व आतील लोखंड उघडे पडते व गंजण्यास सुरुवात होते. गॅल्व्हनायझिंग पद्धतीत लोखंडाची वस्तू ही वितळलेल्या जस्तात बुडवतात. जस्ताचा पातळ थर लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो. उदा., चकाकणारे लोखंडी खिळे, आयर्न पाइप.



Previous Post Next Post