प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलमधील संदेशवहन सेवा |
उत्तर | i) ब्राझीलमध्ये अतिशय विकसित व कार्यक्षम स्वरूपाच्या दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. ii) ब्राझीलमध्ये सुमारे ४५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येकडून इंटरनेटचा वापर केला जातो. iii) ब्राझीलच्या दक्षिण व मध्य भागांत लोकसंख्येचे दाट वितरण आहे व त्यामुळे भागात अत्यंत आधुनिक दूरसंचार सेवांचा वापर केला जातो. iv) ब्राझीलच्या उत्तर भागांत लोकसंख्येचे विरळ वितरण आहे व त्यामुळे या भागात दूरसंचार सेवांचा मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे. |