प्रश्न | टिपा लिहा भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये |
उत्तर | भारतातील पर्यटन व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : i) भारतात पर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, मंदिरे, लेणी, स्वच्छ सागरी किनारे, प्राण्यांची व पक्ष्यांची अभयारण्ये व राष्ट्रीय उदयाने इत्यादी बाबींमुळे भारतातील पर्यटन व्यवसायास चालना मिळाली आहे. ii) ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, वैद्यकीय सेवांचा लाभ मिळवणे, व्यवसाय करणे इत्यादी हेतूनी आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येत असतात. iii) २०१० पासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत सातत्यपूर्ण व लक्षणीय वाढ दिसून येते. iv) आधुनिक काळात भारतात पर्यावरणपूरक पर्यटनास चालना दिली जात आहे |