आकृतीच्या साहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना व कार्य स्पष्ट करा

आकृतीच्या साहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना व कार्य स्पष्ट करा

आकृतीच्या साहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना व कार्य स्पष्ट करा

उत्तर : 

संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना : i) संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये एक धातूची नळी असून, तिच्या प्रत्येक तोंडावर एक, याप्रमाणे कमी नाभीय अंतराची पदार्थ भिंग व नेत्रिका अशी दोन बहिर्गोल भिंगे बसवलेली असतात. दोन्ही भिंगांचे मुख्य अक्ष एका सरळ रेषेत असतात. पदार्थ भिंगाचा छेद आणि नाभीय अंतर हे अनुक्रमे नेत्रिकेचा छेद व नाभीय अंतरापेक्षा बरेच कमी असते..

ii) ही नळी एका स्टँडवर बसवून एका स्क्रूच्या साहाय्याने ती वर - खाली करण्याची केलेली असते. त्यायोगे पदार्थ भिंग आणि वस्तू यांमधील अंतराचे अनुयोजन करता येते. पदार्थ भिंग व नेत्रिका यांमधील अंतरही बदलता येते.


संयुक्त_सूक्ष्मदर्शक

संयुक्त सूक्ष्मदर्शक


कार्य : i) निरीक्षण करायची वस्तू प्रकाशित करून पदार्थ भिंगासमोर त्याच्या नाभीच्या पलीकडे, परंतु नाभीच्या जवळ ठेवतात. पदार्थ भिंगामुळे वस्तूची वास्तव, उलट व विशालित प्रतिमा भिंगाच्या दुसऱ्या बाजूस तयार होते. ही प्रतिमा नेत्रिकेच्या नाभीय अंतराच्या आत पडते.

ii) ही प्रतिमा नेत्रिकेसाठी वस्तू म्हणून काम करते, तर नेत्रिका साध्या सूक्ष्मदर्शकाचे काम करते. त्यामुळे नेत्रिकेपाशी डोळा ठेवून पाहिले असता, डोळ्याशी मोठा कोन करणाऱ्या या वास्तव प्रतिमेपासून अतिविशालित अशी उलट व आभासी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर दिसते. त्यामुळे त्या सूक्ष्म वस्तूच्या अंगोपांगांचे निरीक्षण करणे शक्य होते.

Previous Post Next Post