प्रश्न | टिपा लिहा भारतातील लोहमार्ग |
उत्तर | i) भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात लोहमार्गांचे महत्त्वाचे योगदान आहे. ii) भारतात प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेमार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. iii) उंचसखल भूभाग आणि लोकसंख्येचे विरळ वितरण यांमुळे भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यांत आणि राजस्थान राज्यात लोहमार्गांचे विरळ जाळे आढळते. iv) याउलट, सखल भूभाग व लोकसंख्येचे दाट वितरण यांमुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आढळते. |