प्रश्न | क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ? ते सांगून समुद्र किनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा |
उत्तर | अ) क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ : i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बिण इत्यादी. ii) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. iii) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. ब) समुद्रकिनारी गेल्यावर पुढीलप्रमाणे काळजी घेऊ : i) समुद्रकिनारी फिरावयाला गेल्यावर भरती, ओहोटीच्या वेळी जाणून घेऊ. ii) स्थानिक मार्गदर्शकाशिवाय, समुद्रकिनारे, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळाच्या ठिकाणी जाण्याचे टाळू. iii) समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू. iv) समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू. v) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू. vi) शिक्षक, स्थानिक मार्गदर्शक व सूचनाफलकावरील सुचनांचे तंतोतंत पालन करू.
|