सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत

सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत

 

प्रश्न 

सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत

 उत्तर 


I) फायदे :

i) सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही. 

ii) त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे, तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते. 

iii) सौर ऊर्जा ही हरित अतिशय फायदेशीर आहे. 

II) मर्यादा :

i) सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिससाच विद्युतनिर्मिती करू शकतात. 

ii) तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते. 

iii) सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट (DC) असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती (AC) असतात.   

Previous Post Next Post