काचेच्या त्रिकोणी लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण कसे घडून येते

काचेच्या त्रिकोणी लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण कसे घडून येते

काचेच्या त्रिकोणी लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण कसे घडून येते

उत्तर : 

प्रकाशकिरण काचेच्या त्रिकोणी लोलकावर पडले असता, हवेतून लोलकामध्ये व पुन्हा लोलकामधून हवेत प्रवेश करताना, असे दोन वेळा त्यांचे अपवर्तन होते. आपाती किरण हे जरी लोलकाच्या पायापासून दूर जाणारे असले, तरी लोलक त्रिकोणी असल्यामुळे निर्गत किरण पायाच्या दिशेला वळल्याचे दिसते. अशा रितीने या किरणांचे विचलन होते.

लोलकाच्या द्रव्याचा (काचेचा) अपवर्तनांक निरनिराळ्या रंगासाठी निरनिराळा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशकिरणांचे विचलन वेगवेगळ्या प्रमाणात होते. शुभ्र प्रकाश म्हणजे जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी व तांबडा अशा सात रंगांचे मिश्रण होय. त्यामुळे शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता सात रंगांची वर्णपंक्ती तयार होते.

काचेचा अपवर्तनांक जांभळ्या प्रकाशासाठी सर्वांत जास्त, तर तांबड्या प्रकाशासाठी सर्वात कमी असतो. त्यामुळे जांभळ्या प्रकाशाचे विचलन सर्वांत जास्त, तर तांबड्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते. इतर रंगांच्या प्रकाशाचे विचलन या दोहोंच्यादरस्थान असते. अशा प्रकारे लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण घडून येते.

Previous Post Next Post