भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग कोणते ? ते सांगून द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा

भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग कोणते ? ते सांगून द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा

 

प्रश्न

 भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग कोणते ? ते सांगून द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा

उत्तर

 

अ) भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे आहेत :

1) हिमालय,  2) उत्तर भारतीय मैदान, 

3) द्वीपकल्प, 4) किनारपट्टीचा प्रदेश आणि 

5) द्वीप समूह

ब) भारतातील द्वीप समूहाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

1) लक्षद्वीप बेटे : 

i) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. 

ii) ही बेटे भारताच्या नैर्ऋत्य (पश्चिम) किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत. 

iii) बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत. 

iv) लक्षद्वीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची उंची तुलनेने कमी आहे. 

2) अंदमान आणि निकोबार बेटे :

i) अंदमान आणि निकोबार बेटे हा बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या आग्नेय (पूर्व) किनाऱ्यापासून खूप दूर, बंगालच्या उपसागरात स्थित आहेत. 

ii) अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. 

iii) अंदमान बेटांच्या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत. 

iv) अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' ही भारताचे अतिदक्षिण टोक आहे.        

Previous Post Next Post