प्रश्न | टिपा लिहा भारतातील शेतीवर आधारित उद्योग |
उत्तर | i) भारतात ठिकठिकाणी शेतीवर आधारित उद्योगांचा विकास आहे. भारतात कापूस, ताग आणि साखर या उद्योगांचे कच्च्या मालाच्या प्रदेशांजवळ झाला केंद्रीकरण झालेले आढळते. ii) भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांत ऊस उत्पादन क्षेत्रांजवळ साखर उद्योग, पश्चिम बंगाल राज्यात ताग उत्पादन क्षेत्रांजवळ ताग उद्योग विकसित झाला आहे. iii) भारतातील विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद, प्लायवुड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तू, म्हणजेच वनोत्पादनांवर आधारित वस्तूंच्या निर्मितीचे उदयोग विकसित झाले आहेत. iv) भारतात पश्चिम किनारपट्टीवरील कोकण व केरळच्या किनारी प्रदेशांत काथ्या, फळप्रक्रिया, मासेप्रक्रिया इत्यादी उद्योगांचे केंद्रीकरण झाले आहे. |