संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिक पक्ष

संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिक पक्ष

 

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा प्रादेशिक पक्ष


 उत्तर 


i) विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना 'प्रादेशिक पक्ष' असे म्हणतात.

ii) या पक्षांचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी, असा या पक्षांचा आग्रह असतो. 

iii) आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत.

iv) प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यांमधून होत आहे.



Previous Post Next Post