प्रश्न | डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते |
उत्तर | हे विधान बरोबर आहे कारण - i) राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी नदया पुनरुज्जीवित केल्या. ii) 'तरुण भारत संघ' ही संघटना स्थापून शेकडो गावांमध्ये 'जोहड' म्हणजे मातीचे बंधारे घालून नदया अडवल्या. iii) देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नदया पुनरुज्जीवित करणे अशा मोहिमा राबवल्या. iv) डॉ. राणा यांनी देशभर ११ हजार 'जोहड' बांधले. सतत ३१ वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते. |