मेंडेलीव्हचा आवर्तसारणीचे गुण विशद करा

मेंडेलीव्हचा आवर्तसारणीचे गुण विशद करा

मेंडेलीव्हचा आवर्तसारणीचे गुण विशद करा

उत्तर :

i) आवर्तसारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे, म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदा., बेरिलिअमचे यापूर्वीचे 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले व बेरिलिअमला बोराॅनच्या आधीची जागा दिली. 

ii ) आवर्तसारणीमध्ये मेंडेलीव्हचे शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या. त्यांपैकी तीन अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात  मूलद्रव्यांवरून इका-बोरॉन, इका-अँल्युमिनिअम व इका-सिलिकॉन अशी नावे दिली. मेंडेलीव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील अशी दर्शवली. त्याप्रमाणे त्यांच्या गुणधर्माचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कॅडिअम (Sc), गॅलिअम (Ga) व जर्मेनिअम (Ge) अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीव्हच्या भाकीतांशी जुळणारे आढळले. यामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीचे महत्त्व पटले. 

उदा., इका बोरॉन - स्कॅडिअम 

इका अँल्युमिनिअम - गॅलिअम

इका सिलिकॉन - जर्मेनिअम

iii) मेंडेलीव्हच्या मूळ आवर्तसारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवली नव्हती. जेव्हा हेलिअम, निऑन, अरगॉन इत्यादी निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हा मेंडेलीव्हने मूळ आवर्तसारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात निष्क्रिय वायू ( राजवायू ) ठेवण्यात आले.        

Previous Post Next Post