प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलची किनारपट्टी |
उत्तर | i) ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात. ii) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्तेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो. iii) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनदया येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजाँ बेट, माराजाँ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजाॅ हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकॅटिस या यांच्यादरम्यान तयार झाले आहे. iv) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नदया घेऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे रक्षण होते. |