प्रश्न | द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे |
उत्तर | हे विधान चूक आहे; कारण i) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. ii) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो. iii) द्रविड मुन्नेत्र कळघम हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो तमिळनाडू राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे, तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे. |