टिपा लिहा तमाशा (लोकनाट्य)

टिपा लिहा तमाशा (लोकनाट्य)

प्रश्न 

टिपा लिहा तमाशा (लोकनाट्य)

 उत्तर 

 

i) पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या 'तमाशा' या शब्दाचा अर्थ 'चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य' असा होतो.  

ii) लोककला आणि अभिजात कलाप्रकारांच्या मिश्रणातून तयार झालेला हा मनोरंजनाचा कलाप्रकार अठराव्या शतकात महाराष्ट्रात चांगलाच लोकप्रिय झाला. 

iii) तमाशाचे 'संगीत बारी' आणि 'ढोलकीचा फड' असे दोन परंपरागत प्रकार आहेत. संगीत बारीत लावण्या व संगीत यांच्या तालावर नृत्य केले जाते. ढोलकीचा फड या प्रकारात गण म्हणजेच गणेश वंदन, गवळण, बतावणी व नंतर वग म्हणजेच वगनाट्य सादर केले जाते. 

iv) 'विच्छा माझी पुरी करा' किंवा 'गाढवाचं लग्न' अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाट्ये खूप गाजली.

Previous Post Next Post