प्रश्न | टिपा लिहा पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये |
उत्तर | पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : i) पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेला आहे. ii) पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे. पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठारी नदयांचे उगमस्थान आहे. iii) पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला, तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग (खिंडी) आहेत. iv) पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. |