आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते
उत्तर :
i) प्राचीन काळी व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी जलमार्गाची फार मोठी मदत झालेली आहे. मात्र आज जलवाहतुकीचे स्वरूप बदलले असून जगातील ९५% आंतरराष्ट्रीय व्यापार हा जलमार्गाने चालतो.
ii) प्रचंड अवजड मालाच्या वाहतुकीसाठी जलमार्गाचाच वापर प्रामुख्याने केला जातो. या मार्गाची वाहतूकक्षमता इतर कोणत्याही मार्गापेक्षा फार मोठी आहे.
iii) आज प्रचंड व विशिष्ट आकाराची जहाजे निर्माण झाल्याने खनिजे, अन्नधान्य, खनिजतेल यांची वाहतूक कमी खर्चात व लांब अंतरापर्यंत करता येते.
iv) पृथ्वीचा ७१% भाग पाण्याचे व्यापलेला असून त्यात महासागरांचा वाटा फार मोठा आहे. जगातील सर्व महासागर एकमेकांना जोडलेले असल्याने त्यातून लांब पल्ल्याची, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलवाहतूक करता येते. याचा अर्थ सागरमार्गीय खुल्या वाहतुकीसाठी पृथ्वीवर विस्तृत क्षेत्र उपलब्ध आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.