प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलमधील शेती उद्योग |
उत्तर | i) ब्राझीलमधील ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश या भागांत शेती व्यवसायाची भरभराट झाली आहे. ii) येथील सौम्य हवामान, मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान व तेथील भूरचना यांमुळे ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेश या भागांत विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन होते. iii) ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात व मका या खाद्यान्न पिकांचे, कॉफी, काकाओ (कोको), रबर आणि ऊस या नगदी पिकांचे आणि केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. iv) ब्राझील देशातून सर्वाधिक प्रमाणावर कॉफी व सोयाबीन या उत्पादनांची निर्यात होते. |