प्रश्न | टिपा लिहा भारतातील सदाहरित वने |
उत्तर | i) भारतात सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य व भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत सदाहरित वने आढळतात. भारतात मुख्यतः अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, असम इत्यादी प्रदेशांत सदाहरित वने आढळतात. ii) भारतातील सदाहरित वनांमध्ये प्रामुख्याने महोगनी, शिसव, रबर, चंदन इत्यादी वृक्ष आढळतात. या वनांत वृक्षांप्रमाणे विविध प्रकारच्या वेलीही आढळतात. iii) भारतातील सदाहरित वनांतील वृक्षांचे लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. या वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. iv) या वनांत विविध प्रजातींच्या प्राण्यांचे व पक्ष्यांचे वास्तव्य आढळते. |