प्रश्न | टिपा लिहा भारतातील रस्ते मार्ग |
उत्तर | i) भारतात अंतर्गत वाहतुकीसाठी रस्ते मार्गांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ii) भारतातील सुमारे ८५ टक्के प्रवासी वाहतूक रस्ते मागांनी होते. iii) देशातील सुमारे ७० टक्के मालवाहतूकही रस्ते मार्गाने होते. iv) भारतात उत्तर दक्षिण महामार्ग, पूर्व-पश्चिम महामार्ग, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व इतर रस्ते यांचे दाट जाळे पसरलेले आहे.. |