अंतर्गोल भिंगाचे तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम लिहा.
उत्तर :
अंतर्गोल भिंगाचे तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम :
i) जर आपाती किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास भिंगाच्या मुख्य नाभीतून जातो.
ii) जर आपाती किरण भिंगाच्या मुख्य नाभीतून (नाभी F2 च्या दिशेने) जात असेल तर अपवर्तित किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो.
iii) जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल, तर त्याची दिशा बदलत नाही.