प्रश्न | टिपा लिहा ब्राझील देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सद्य:स्थिती |
उत्तर | i) ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास ७ सप्टेंबर १८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. ii) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. १९८५ पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे. iii) विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यांतून हा देश सावरला आहे. iv) जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्य:स्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते. |