व्याख्या लिहा सापेक्ष आर्द्रता
शेकडा सापेक्ष आर्द्रता सूत्रात व्यक्त करा.
उत्तर :
हवेच्या ठरावीक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात.
शेकडा सापेक्ष आर्द्रता = [ ठरावीक आकारमानात व तापमानास हवेतील प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान ÷ त्याच आकारमानाची हवा त्याच तापमानास संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान ] X 100%.