टिपा लिहा भारतातील समुद्राकाठची वने

टिपा लिहा भारतातील समुद्राकाठची वने

 

प्रश्न 

टिपा लिहा भारतातील समुद्राकाठची वने


 उत्तर 

 

i) भारतातील किनाऱ्यालगतच्या उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशांत, दलदलीच्या प्रदेशांत, खाड्यांच्या व खाजणांच्या भागात, क्षारयुक्त मृदा असणाऱ्या प्रदेशांत समुद्राकाठची वने आढळतात. 

ii) भारतात पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात व पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात समुद्राकाठची वने आढळतात.

iii) समुद्राकाठच्या वनांत प्रामुख्याने सुद्री व खारफुटी वनस्पती आढळतात. त्यामुळे ही वने सुंद्रीची वने किंवा खारफुटीची वने म्हणूनही ओळखली जातात.

iv) या वनांतील वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते.


Previous Post Next Post