शृंखलाबंधन शक्ती यावर थोडक्यात टीप लिहा

शृंखलाबंधन शक्ती यावर थोडक्यात टीप लिहा

शृंखलाबंधन शक्ती यावर थोडक्यात टीप लिहा

उत्तर :

i) कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची क्षमता असते व यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती म्हणतात.

किंवा

कार्बन अणू स्वत:शीच बंध तयार करून लांब साखळी तयार करू शकतो. 

ii) कार्बन अणूमध्ये दुसऱ्या अणूंबरोबर बद्ध होण्याची विशेष क्षमता असते. कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्यामध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची परस्परांत संदान करून मुक्त किंवा बद्ध शृंखला तयार होतात. यात मुक्त शृंखला ही सरल-शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. बद्ध शृंखला ही वलयाकृती शृंखला असते. दोन कार्बन अणूंमधील सहसंयुज बंध प्रबळ असल्यामुळे स्थायी असतात व त्यामुळे कार्बनला शृंखलाबंधन शक्ती प्राप्त होते. 

iii) या गुणधर्मामुळेच कार्बन अगणित संयुगे तयार करू शकतो.


कार्बनच्या_तयार_होणाऱ्या_शृंखला,

कार्बनच्या तयार होणाऱ्या शृंखला


Previous Post Next Post