प्रश्न | टिपा लिहा हिमालय पर्वत |
उत्तर | i) हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताचा सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वतप्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे. ii) हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे. iii) दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. iv) हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (असम हिमालय) असेही भाग केले जातात. |