पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ?
उत्तर :
पदार्थाच्या विशिष्ट उष्माघारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा उपयोग करतात. हे तत्त्व असे आहे :
उष्णता विनिमयाचे तत्व : दोन वस्तूंची प्रणाली (System) वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास, पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही: अशा स्थितीत, उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान समान होते.