प्रश्न | टिपा लिहा ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला धोरण |
उत्तर | i) ब्राझीलमध्ये दक्षिण व आग्नेय भागांत विविध औद्योगिक प्रदेशांत व 'सावो पावलो' या नव्याने विकसित झालेल्या महानगरात नागरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ii) देशातील पश्चिमेकडील भागांत व इतर भागांत नागरीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. iii) देशातील विशिष्ट भागांत होणारी लोकसंख्येची वाढ व लोकवस्त्यांचे केंद्रीकरण टाळण्यासाठी ब्राझील सरकारने 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे. iv) या धोरणामुळे ब्राझीलमधील केवळ विशिष्ट भागांत होणाऱ्या नागरीकरणाचे प्रमाण कमी होईल. परिणामी लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होऊन देशातील लोकसंख्येच्या वितरणातील असमतोल कमी होईल. |