प्रश्न | टिपा लिहा भारतातील हिमालयातील वने |
उत्तर | i) भारतात हिमालय पर्वतरांगांत वने आढळतात. या वनांना भारतातील हिमालयीन वने असे संबोधतात. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे तीन प्रकार पडतात. ii) हिमालयातील अतिउंच प्रदेशात हवामान अतिशय थंड असते. या प्रदेशात उन्हाळ्यात काही प्रमाणात बर्फ वितळते. त्यामुळे येथील वनस्पतींना उन्हाळ्याच्या हंगामात रंगीबेरंगी फुले येतात. iii) हिमालयातील मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचिपर्णी वृक्षांची वने आढळतात. या वनांतील वृक्षांची पाने टोकदार व निमुळती असल्यामुळे या पानांवर पडणारे बर्फ पानांवरून खाली घसरते. iv) हिमालयातील कमी उंचीच्या म्हणजेच पायथ्यालगतच्या प्रदेशांत सूचिपर्णी व पानझडी वृक्ष अशी मिश्र वने आढळतात. या वनांमध्ये प्रामुख्याने साल वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. |